जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:05 IST2018-10-31T13:03:06+5:302018-10-31T13:05:39+5:30
जालना जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जालन्यात पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन उत्साहात पार
जालना : जालना जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथानला गांधी चमन येथून सुरुवात झाली. मस्तगड मार्गे मंमादेवी चौक, मामा चौक, सिंधी बाजार मार्ग शिवाजी पुतळा येथे पुन्हा पाणीवेस मार्ग मंमादेवी रोड, मस्तगड, गांधी चमन येथे राष्ट्रगीत म्हणून समारोप करण्यात आला.
याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, उपपोलीस अधीक्षक राहुल गायकवाड, पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोनि. साईनाथ ठोंबरे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जयसिंग परदेशी आदींची उपस्थिती होती.