शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तूर खरेदीला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:23 AM

हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर फक्त ७७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नसल्याने नोंदणी केलेले शेतकरी हैराण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर फक्त ७७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नसल्याने नोंदणी केलेले शेतकरी हैराण झाले आहेत. खरेदीला कधी मुहूर्त लागणार, याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शासनाने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खुल्या बाजारात तुरीला ६००० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने अनेक शेतक-यांनी हमीभावाच्या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे.यामुळे नोंदणीच्या सुरुवाती पासूनच केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. भोकरदन १, अंबड ६ आणि जालना ६० अशा फक्त ७७ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही नाफेडने खरेदी सुरु केली नाही.शासनाकडून विक्री केलेल्या मालाचे पैसे देण्यास विलंब होत असताना देखील काही शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली आहे. दोन आठवडे झाले तरी अद्यापही तूर खरेदीला सुरुवात झाली नाही. शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत असून खरेदी कधी सुरू करणार, अशी विचारणा करताना दिसत आहेत.

टॅग्स :pigeonsकबुतरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र