घंटनाद आंदोलनात जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:38 IST2021-03-04T20:38:40+5:302021-03-04T20:38:51+5:30
जळगाव : घोषीत शाळांना वीस टक्के तर वीस व चाळीस टक्के अनुदानीत शाळेतील विनाअनुदानीत तुकड्यांना अनुदान द्यावे, यासह इतर ...

घंटनाद आंदोलनात जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेचा सहभाग
जळगाव : घोषीत शाळांना वीस टक्के तर वीस व चाळीस टक्के अनुदानीत शाळेतील विनाअनुदानीत तुकड्यांना अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून गुरूवारी जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक यांनी शाळेतचं घंटानाद आंदोलन करून पाठींबा दर्शविला.