मनोरुग्ण वृद्धेचा पद्मावती धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:21 IST2019-05-09T00:20:08+5:302019-05-09T00:21:13+5:30
भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

मनोरुग्ण वृद्धेचा पद्मावती धरणात बुडून मृत्यू
पारध : भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
भिमबाई किसन शिंगणे (८०, वळती ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. ही महिला बारा वर्षांपासून मासरूळ (ता.जि. बुलढाणा) येथे तिच्या मुलीकडेच वास्तव्यास होती. मंगळवारी वालसावंगी येथील दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी जात असल्याचे महिलेने घरी सांगितले.
दरम्यान, बुधवारी सकाळी पारध येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात सदर महिलेचा मृतदेह तरंगतांना ग्रामस्थांना दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पारध पोलीस ठाण्याचे प्रकाश सिनकर, सुरेश डुकरे, नागरे यांनी घटनास्थळी भेट घेऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. पुढील तपास सपोनि. शंकर शिंदे हे करत आहेत.