शहरी भागातील पंतप्रधान आवास योजनेची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:03+5:302021-02-14T04:29:03+5:30

शुक्रवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पालिका आणि नगरपंचायतींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ...

The pace of the Prime Minister's Housing Scheme in urban areas | शहरी भागातील पंतप्रधान आवास योजनेची कासवगती

शहरी भागातील पंतप्रधान आवास योजनेची कासवगती

शुक्रवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पालिका आणि नगरपंचायतींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजना, रस्ते, तसेच घरकुल, घनकचरा प्रकल्पांचा समावेश होता. अनेक गावांमध्ये हे चारही प्रश्न गंभीर असल्याचे वास्तव बैठकीत दिसून आले. याबाबत आता नगरविकासमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तसेच त्या-त्या पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले, तसेच आगामी तीन महिन्यांत कामांच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्यांना स्वत:चे घर नसेल, तर त्यांना घर घेण्यासाठी अथवा बांधण्यासाठी सरासरी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. असे असतानाही ही योजना जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि चार नगरपंचायतींमध्ये कासवगतीने राबविली जात असल्याचे दिसून आले.

पंतप्रधान आवास योजनेची स्थिती दर्शविणारा तक्ता.

Web Title: The pace of the Prime Minister's Housing Scheme in urban areas