शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

देऊळगाव राजा : शासनाचा विविध विकासकामांतर्गत मिळालेल्या निधीत अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील निमगाव गुरू येथील तत्कालीन सरपंच, ग्रामसचिवावर फौजदारी गुन्हा ...

देऊळगाव राजा : शासनाचा विविध विकासकामांतर्गत मिळालेल्या निधीत अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील निमगाव गुरू येथील तत्कालीन सरपंच, ग्रामसचिवावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यासंदर्भात बुलडाणा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, विस्ताराधिकाऱ्यांनी सरपंचांविरुद्ध तक्रार दिली असून, अधिकाऱ्यांबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे.

तालुक्यातील निमगाव गुरू येथील तत्कालीन सरपंच राधाबाई अनिल चित्ते व तत्कालीन ग्रामसेवक संतोष पी. मोरे यांनी संगनमताने विविध शासकीय निधीत अपहार केल्याबाबत, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर आत्माराम भालेराव यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध विकासकामासाठी प्राप्त निधीत शौचालय बांधकाम, रंगमंच, आवार भिंत बांधणे, समाज मंदिर दुरुस्ती व बांधकाम, नाली दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाडी साठी कपाट व इतर साहित्य खरेदी, एलईडी लाइट खरेदी, अंगणवाडीसाठी खेळणी खरेदी अशा विविध कामांत शासकीय निधीत अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्यामार्फत नेमण्यात आलेल्या समितीने चौकशीअंती १ लाख ५७ हजार ८६५ रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा अहवाल दिला होता.

दरम्यानच्या काळात अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्यावरही पंचायत समिती प्रशासन कारवाई करण्यास विलंब करीत असल्याने तक्रारदारांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार, २० नोव्हेंबर, २०२० रोजी एका पत्राद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना सदर अनियमिततेस जबाबदार व्यक्तीविरुद्ध पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. सदर आदेशाला तीन महिने उलटल्यानंतर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी विस्तार अधिकारी एस.ए. गडाख यांची एका पत्राद्वारे तक्रार देण्यास नेमणूक केली. यावरून तत्कालीन सरपंच राधाताई अनिल चित्ते व तत्कालीन ग्रामसेवक एस.पी. मोरे यांना लेखी पत्र देऊन चौकशी अहवालात नमूद मुद्द्यामधील अपहारित रक्कम समप्रमाणात प्रत्येकी ७८ हजार ९३३ रुपये ग्रामपंचायत निधीमध्ये जमा करून विनाविलंब अहवाल सादर करण्याचीची नोटीस बजावण्यात आली. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी अपहारित रक्कम जमा न केल्याने, गत २७ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात सरपंच राधाबाई अनिल चित्ते यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यासाठी विस्तार अधिकारी गडाख यांनी रीतसर लेखी तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे, ग्रामसचिव संतोष मोरे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेकरिता जिल्हा परिषद प्रशासनाकडे पूर्वपरवानगी मागितली आहे.

विलंबास राजकीय दबाव कारणीभूत

एक वर्षापूर्वी सरपंच व ग्रामसेवक यांनी विकास कामाच्या निधीत अफरातफर केल्याची तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीत तथ्य आहे, हे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनातील चौकशी समितीच्या अहवालावरून सिद्ध झाले. तीन महिन्यांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांविरुद्ध विनाविलंब पोलिसात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा, असे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, राजकीय दबावापोटी तक्रार देण्यास उशीर झाल्याची तक्रार या प्रकरणातील तक्रारदाराने लेखी स्वरूपात केली आहे.