शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १३ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST

जालना : जिल्ह्यातील चार जणांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात शनिवारी केवळ १३ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून ...

जालना : जिल्ह्यातील चार जणांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात शनिवारी केवळ १३ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गत महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या समाधानकारकरीत्या घटली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्या उपाययोजनांना जिल्हावासीयांची साथ मिळाल्याने कोरोनाबाधितांची संख्या दिलासादायकरीत्या घटली आहे. आराेग्य विभागाला शनिवारी ५२७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, केवळ चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७६ वर गेला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा समावेश आहे. तर सेवली येथील एक, मंठा तालुक्यातील बोदरा येथील एक व अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या १३ सक्रिय रुग्ण आहेत. काहींवर रुग्णालयात तर काहींवर गृह अलगीकरणात उपचार सुरू आहेत.

संस्थात्मक अलगीकरणात एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात २५ संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू आहेत. त्यातील अंबड येथील अलगीकरणात गत काही दिवसांपर्यंत रुग्णांवर उपचार केले जात होते. सद्य:स्थितीत मात्र या २५ संस्थात्मक अलगीकरणात एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

११८९ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ७०८ वर गेली असून, त्यातील ११८९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ८१५ जणांचा शासकीय रुग्णालयात तर ३७४ जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ५०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

३९६७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आजवर ६ लाख २३ हजार ८९१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. दैनंदिन अहवालात ५२७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर अद्याप ३९६७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे.