सेफ्टी टँकमध्ये बुडाल्याने एका कामगाराचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:07 IST2021-04-30T19:06:53+5:302021-04-30T19:07:14+5:30
जालना शहरातील सोनलनगर भागातील एक सेफ्टी टँक साफ करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी तीन कामगार गेले होते.

सेफ्टी टँकमध्ये बुडाल्याने एका कामगाराचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू
जालना : सेफ्टी टँक साफ करीत असताना आतमध्ये बुडाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर इतर दोन कामगारांचा अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत. ही घटना जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सोनलनगरमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडली.
जालना शहरातील सोनलनगर भागातील एक सेफ्टी टँक साफ करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी तीन कामगार गेले होते. परंतु, हे काम करीत असताना ते तिघे टँकमध्ये अडकले. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचरण करण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर एका कामगाराला सेफ्टी टँकमधून बाहेर काढून खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. त्या सेफ्टी टँकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे इतर दोघांचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हे पाणी उपसल्यानंतर त्या दोघांना बाहेर काढता येईल, असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.