जालन्याजवळ लक्झरी बस उलटून एक महिला प्रवासी ठार; 20 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:38 IST2019-01-31T10:55:05+5:302019-01-31T11:38:35+5:30
नागपूरहुन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक लक्झरी बस जालना शहराजवळील सिंदखेड चौफुली येथे उलटली.

जालन्याजवळ लक्झरी बस उलटून एक महिला प्रवासी ठार; 20 जखमी
जालना : नागपूरहुन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक लक्झरी बस जालना शहराजवळील सिंदखेड चौफुली येथे उलटली. पहाटे ३ वाजता झालेल्या या अपघातात एक महिला प्रवासी ठार झाली असून अन्य १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नागपूरवरून पुण्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स (MH-14 GU-4398) बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निघाली. आज पहाटे 03.00 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जालना शहरालगतच्या बायपास रोडने जात होती. यावेळी फॉरेस्ट ऑफीसच्या जवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. यात प्रवासी सुरेखा जयंत खडतकर ( 46, रा. हडपसर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य १५ प्रवासी जखमी आहेत. या प्रकरणी गाडी चालक महिंद्रा दौलतराव सावरकार (33,अमरावती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी प्रवासी :
योगेश शहाद मुंजाल, मलकियतसिंग मनीनदरसिंग, बादुराव अंतिराभ एखंडे, मंजुळा बाबुराव एखंडे, अमित गोपालराव शाहा, सतिष ओमग्रकाश बजाज, रूची संतोष बजाज, नंदिनी चंद्रकांत तळवतकर, मुस्तफा शब्बीर बोहरा, नंदकिशोर दादारावजी ठाकरे, अशिका नंदकिशोर ठाकरे, सुरभी शरद, श्रेया संजय चोपकर, स्नेहल अनिल सियाले, गजानन भागवत शिंदे.
पहा व्हिडिओ :