दुचाकी, अॅपेची धडक एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:31 IST2018-11-19T00:31:26+5:302018-11-19T00:31:38+5:30
अॅपेरिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात समोरा - समोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता देऊळगावराजा मार्गावरील शिंदे फार्महाऊस जवळ घडली.

दुचाकी, अॅपेची धडक एक ठार, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : अॅपेरिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात समोरा - समोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता देऊळगावराजा मार्गावरील शिंदे फार्महाऊस जवळ घडली. राहुल सुनील मुळे (१८) असे मयत युवकाचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील भीवपूर येथील बाबासाहेब मुळे, राहुल सुनील मुळे मोटरसायकल क्रमांक एम.एच. १५ बी.सी.७५४३ देऊळगावराजा येत होते. तर अॅपेरिक्षा क्रमांक एम.एच. २८ एच. ४५१८ देऊळगावराजावरुन जालना कडे जात होता. सुसाट जात असलेल्या दोन्ही वाहनांची शिंदे फॉर्म हाऊस जवळ समोरा - समोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील राहुल मुळे याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी बाबासाहेब सुखदेव मुळे (२२) याला तातडीने जालना येथे रुग्णालयात दाखल केले.
संदीप सुनील मुळे यांच्या फिर्यादीवरुन अॅपेचालकाविरुध्द देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. राठोड करीत आहेत.