शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

टेंभुर्णी : आपल्या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी सावंगी फाट्यावर आलेल्या एका इसमाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील ...

टेंभुर्णी : आपल्या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी सावंगी फाट्यावर आलेल्या एका इसमाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील सावंगी- गोंधनखेडा फाट्यावर बुधवारी रात्री घडली. यात सुभाष कचरूबा अढावे (५५) हे जागीच ठार झाले.

सावंगी वरगणे येथील सुभाष कचरुबा अढावे हे आपल्या मुंबईला जाणा-या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी परिवारासोबत सावंगी फाट्यावर आले होते. फाट्यावरून रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणा-या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात अढावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सावंगी येथील ग्रामस्थांनी त्यांना तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत अढावे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी टेंभुर्णी येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी सावंगी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचा मुलगा विलास आढावे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फोटो

मयत सुभाष अढावे