बुडून एकीचा मृत्यू, दोघींना वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:52 IST2018-06-12T00:52:18+5:302018-06-12T00:52:18+5:30
घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १७ वर्षे हिचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

बुडून एकीचा मृत्यू, दोघींना वाचवण्यात यश
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील भादली येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १७ वर्षे हिचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली
सकाळी वैष्णवी व दोन मैत्रीनी गावाच्या मारुती मंदिरा मागील गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर अंघोळ करत असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवीचा बुडून मृत्यू झाला. तर दोघी जणींना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.
सोमवारी ज्ञानेश्वरी गजानन तौर वय १५, प्रतीक्षा संजय तौर वय १५ व वैष्णवी गोपीनाथ बिडवे वय १६ या तिघीजणी कपडे धून्यासाठी तलावावर गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर आंघोळ करण्यासाठी नदीच्या काठावर गेल्यावर कमी पाण्यात पोहता, पोहता अचानक खोल पाण्यात गेल्याने तिघी जणी बुडू लागल्या नदीच्या बाजूला असलेल्या कृष्णा तुकाराम शिंदे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ज्ञानेश्वरी व प्रतीक्षा ला वाचवण्यात यश आले. दरम्यान या प्रकारामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत वैष्णवीवर सायंकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले.