जालन्यात चोरीच्या दुचाकीसह एकजण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:12 IST2019-01-17T19:12:08+5:302019-01-17T19:12:30+5:30

विशेष कृती दलाच्या पथकाने केली कारवाई.

One arrested with a stolen bike in Jalna | जालन्यात चोरीच्या दुचाकीसह एकजण जेरबंद

जालन्यात चोरीच्या दुचाकीसह एकजण जेरबंद

जालना : शहरातून दुचाकी चोरुन घेवून जाणाऱ्यास विशेष कृती दलाच्या पथकाने आज ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकीसह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अर्जुनसिंग प्रितीसिंग कलानी (रा. हिन्दनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

११ डिसेंबर रोजी प्रफुल्ल गोविंदराव निटुरकर (रा. संदानद अ‍ॅपार्टमेर्न्ट रेल्वेस्थानक जालना) यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली होती. दरम्यान, पोनि. यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, ही दुचाकी अर्जुनसिंग कलानी याच्याकडे आहे. या माहितीवरुन हिन्दनगर भागात त्याचा शोध घेतला असता, त्याच्या राहत्या घराच्या बाजूला तो लपून बसलेला मिळून आला. त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. एम. बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, संदीप चिचोले, राजू पवार यांनी केली.
 

Web Title: One arrested with a stolen bike in Jalna