One and a half lakh rupees long | साडेचार लाख रुपये लांबविले
साडेचार लाख रुपये लांबविले

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : पोलीस असल्याचा बनाव करून शेळ्या विकत घेणाऱ्या व्यापा-याला ४ लाख ६१ हजार रुपयांना लुटल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास येडशी- औरंगाबाद महामार्गावरील अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथे घडली.
हैदराबादहून चार व्यापारी हे शेळ््या खरेदी करण्यासाठी अजमेर येथे ट्रक (क्रं. आरजे. १९. जेडी.२४७८) ने जात होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता येडशी - औरंगाबाद महामार्गावरील गहिनीनाथनगर येथे दुचाकीवरून येणा-या तिघांनी ट्रकला अडवून ट्रकला थांबवले.
आम्ही पोलीस असून, तुमच्या गाडीतून गांजा विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे माहिती मिळाली असल्याचे त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. सदर गाडी पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे सांगून तिघांपैकी एक जण ट्रकमध्ये बसला. थोड्या अंतरावर जाऊन दुचाकीवरील दोघांनी कागदपत्रे चेक करायचे म्हणून पुन्हा गाडी थांबवून व्यापा-यांना खाली उतरविले. दुचाकीवरील दोघांनी ट्रकमध्ये चढवून रोख रक्कम ४ लाख ६१ हजार रुपये घेऊन तिघे दुचाकीवर बसून पसार झाले.
त्यानंतर व्यापारी सदर ट्रक घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात गेले. तेथे गेल्यावर पोलिसांनी या घटनेशी काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर व्यापा-यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि. अतुल येरमे व कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. सदर घटना ही गोंदी पोलीस ठाणे हद्दीत असल्याने येरमे यांनी गोंदी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती कळताच अंबडचे उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण व गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले. मात्र, सीसीटीव्हीतही ते आढळले नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटना संशयास्पद आहे. चोरट्यांचा तपास आम्ही करीत आहोत.
अंबड व गेवराई तालुका हद्दीतील महामार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. चौकशी सुरू असून, लवकरच घटनेचा छडा लावू, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी. शेवगण यांनी
सांगितले. परिसरातील लोकांकडूनही माहिती घेतली जात आहे.
चोरट्यांनी एटीएममधील रक्कम पळवली
जालना: एटीएममध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी एटीएम मशिन फोडल्याची घटना जालना शहरातील नूतन वसाहत भागात सोमवारी रात्री घडली. या मशीनमध्ये १३ हजार रुपये रोख रक्कम असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील जुना जालना भागातील नूतन वसाहत येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन आहे.
सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले. मंगळवारी सकाळच्या सुमारास चोरट्यांनी हा प्रकार केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, या फुटेज आधारे त्या चोरट्यांचा शोध सुरु आहे. दोन चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. परंतु या चोरंट्याचे चेहरे मात्र, स्पष्ट दिसत नाहीत.
दिवाळीचा सण असल्यामुळे सुदैवाने या एटीएममध्ये केवळ होम क्रेडीट म्हणून १३ हजार रुपये होते. परंतु मुख्य रस्त्यावर असलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांच्यासह इतर अधिका-यांनी पाहणी केली आहे.

Web Title: One and a half lakh rupees long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.