शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तुरीची आवक घटल्‍याने तेल बाजारात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दिनांक १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मागील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : दिनांक १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून मंदीचे वातावरण दिसून येत आहे. मात्र, तेल बाजारात मोठी तेजी पाहावयास मिळत आहे. त्‍याचबरोबर तुरीची आवक घटल्‍याने भावात तेजी आली आहे. दरम्‍यान, तेल बाजारात आयात शुल्‍क वाढविण्याविषयी सोमवारी मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्‍याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोरोनामुळे मागील काही महिन्‍यांत बाजारपेठेत मंदी आल्यामुळे अर्थव्‍यवस्‍थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या जालना बाजारपेठेत तुरीची आवक घटली असून, यामुळे १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटलची तेजी आली आहे. विदर्भातील अमरावती व जळगाव याठिकाणी खरेदी अधिक प्रमाणात झाली आहे. कर्नाटक परिसरातील तुरीचा माल खराब झाल्‍याने येथील आवक जवळपास बंद झाली आहे. जालना बाजारपेठेत ५ हजार क्विंटलची सरासरी आवक होत असून, भाव ५,६०० ते ६,३००च्या दरम्‍यान आहेत.

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा १७ लाख टनांचा जाहीर केला असून, हा कोटा कमी असल्‍यामुळे साखरेमध्ये क्विंटलमागे ३० ते ४० रुपये वाढले आहेत. सध्या साखरेचा भाव ३,२५० ते ३,४०० या दरम्यान आहे. नवीन हरभऱ्याचा जालना बाजारपेठेत श्रीगणेशा झाला आहे. नवीन हरभऱ्याची आवक ५० पोत्‍यांची आहे तर भाव ४,३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये हरभऱ्याची आवक धीम्‍यागतीने वाढण्याची चिन्‍हे आहेत. जालना बाजारपेठेत जुन्‍या हरभऱ्याची आवकही सध्या सुरू असून, १०० क्विंटल प्रतिदिन आवक सध्या बाजारात होत आहे. याला ३,२००पासून ४ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. मक्‍याची आवक ८०० क्विंटलची असून, ५० रुपयांच्‍या मंदीनंतर भाव १,१०० ते १,३०० च्‍या दरम्‍यान आहेत. सोयाबीनची दैनंदिन आवक ३०० क्विंटलची होत असून, यामध्ये १०० रुपये प्रतिक्विंटल वाढ दिसून येत आहे. भाव ४,३०० ते ४,४०० या दरम्‍यान आहेत.

दरम्‍यान, कृषी मंत्रालयाने खाद्य तेलांसाठी राष्ट्रीय अभियानांतर्गत १९ हजार करोड रुपयांची मागणी केल्‍याचे वृत्त असून, त्‍यामुळे बाजारपेठेत तेलांच्‍या आयात शुल्‍कामध्ये वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्‍याने, तेल बाजारात चढ-उतार पाहावयास मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्‍या किमती २०० रुपये क्विंटलमागे वाढल्या आहेत. सोयाबीन तेल ११,७०० रुपये, सरकी तेल ११,५००, पामतेल ११,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव सध्या बाजारात आहे.

अन्नधान्‍याचे बाजारभाव

गहू १,६५० ते २,२५० प्रतिक्विंटल

ज्‍वारी १,४०० ते २,७०० प्रतिक्विंटल

बाजरी १,१२५ ते १,३५० प्रतिक्विंटल

मूग ४,००० ते ६,५०० प्रतिक्विंटल

उडीद ३,५०० ते ६,५०० प्रतिक्विंटल

गूळ २,५०० ते ३,१०० प्रतिक्विंटल

हरभरा डाळ ५,१०० ते ५,३०० प्रतिक्विंटल

तूरडाळ ८,५०० ते ९,५०० प्रतिक्विंटल

उडीद डाळ ९,५०० ते १०,००० प्रतिक्विंटल

शेंगदाणे ९,००० ते १०,००० प्रतिक्विंटल

साबुदाणा ४,००० ते ४,७०० प्रतिक्विंटल