बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:16 IST2018-07-28T01:15:49+5:302018-07-28T01:16:33+5:30

बदनापूर येथे गुरूवारी रात्री अज्ञात इसमांनी भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाची मोडतोड केली.

The office of Narayan Kuche demolished in Badnapur | बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले

बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथे गुरूवारी रात्री अज्ञात इसमांनी भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाची मोडतोड केली. तसेच भाजपाचे माजी जि.प. उपाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या व पंचायत समिती कार्यालयातील एक टेम्पो जाळल्याची घटना घडली आहे.
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर जालना - औरंगाबाद महामार्गावर बदनापूरचे आ. नारायण कुचे यांचे संपर्क कार्यालय असून या कार्यालयावर दि. २६ जुलै रोजी रात्री उशिरा अज्ञात इसमांनी या कार्यालयातील पंधरा ते विस खिडक्यांच्या काचा फोडल्या, काही दरवाजे तोडले, कार्यालयातील खुर्चा व संगणकांची नासधूस केली़ सदर घटनेबाबत आ नारायण कुचे म्हणाले की, माझ्यावर जो रोष व्यक्त करण्यात आला, तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी मला विधानसभेत निवडून दिलेले आहे आज माझ्या कार्यालयावर जो हल्ला झाला हा हल्ला कुणी केला का केला, हे माहीत नाही. माझी कुणाविषयी तक्रार नाही
याविषयी देवीदास कुचे म्हणाले की पाच ते दहा अज्ञात इसमांनी हा हल्ला केला असून, या हल्ल्यात येथील चौकीदारास मारहाण करण्यात आली

Web Title: The office of Narayan Kuche demolished in Badnapur