शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 07:58 IST

उपोषणाचा आठवा दिवस : वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : मागील आठ दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीच सांगितले आहे. उद्याच (शुक्रवारी) शासकीय शिष्टमंडळ वडीगोद्री येथे पाठवितो, असे मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांना फोनवरून सांगितले.  

वडेट्टीवार  म्हणाले, काल आणि आजही मुख्यमंत्र्यांशी आपण बोललो आहोत. ओबीसी समाजात जन्मलेली व्यक्ती म्हणून ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभा राहणे माझे कर्तव्य आहे.  मतांसाठी समाजाला भडकविण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. उद्या शिष्टमंडळ येणार आहे. लागले तर मीपण येतो. उद्या आंदोलन समाप्त करू या, असेही ते म्हणाले.  

आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे : आंबेडकर  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही गुरुवारी उपोषणकर्ते हाके, वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली. ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे. परंतु, दोघांना एकमेकांसमोर विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील, अशी माझी धारणा असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. 

उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार हाके आणि वाघमारे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, डॉक्टरांनी दोन्ही उपोषणकर्त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

लातुरात ओबीसींचे साखळी उपोषणलातूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर येथील गांधी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हरिभाऊ गायकवाड यांच्यासह ओबीसी तसेच व्हीजेएनटी प्रवर्गातील कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.

नांदेडमध्ये रास्ता रोको ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांनी गुरुवारी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे नांदेड-लातूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

...अन्यथा ओबीसी पेटून उठेल : अशोक जीवतोडेचंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये याची काळजी  सरकारने घ्यावी, अन्यथा ओबीसी पेटून उठेल, असा इशारा भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. अशोक जीवताेडे यांनी दिला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील