शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

'आमदारांच्या पगारात कपात नाही, शेतकऱ्यांच्या अनुदानात का?'; कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:29 IST

'हे सरकार अधिकाऱ्यांचं आहे का?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

- पवन पवार

वडीगोद्री (जालना): कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त केला. “आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते? हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांना विचारला.

भिजलेला कापूस हातात घेऊन मांडली व्यथाबुधवारी सकाळी ११:३० वाजता मंत्री भरणे यांनी धाकलगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने भिजलेला कापूस हातात घेऊन अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था दाखवली. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मागील वर्षी फळबागांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार आणि कोरडवाहू पिकांसाठी १८ हजार रुपये मदत मिळत होती. मात्र, आता सरकार तटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे."

यावेळी शेतकऱ्यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, बँकांनी होल्ड केलेली खाती मोकळी करावीत, तसेच 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे कर्ज खात्यात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या हातात द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन कृषिमंत्र्यांना दिले.

'दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणार'शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी त्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कधी गारपीट होते, कधी अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळ पडतो. सगळ्यांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळेल. कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.” यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार शिवाजी चोथे, माजी आमदार अरविंद चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना