मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 09:54 IST2025-02-09T09:52:42+5:302025-02-09T09:54:10+5:30

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या मेहुण्यासह नऊ जणांविरोधात प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली.

Nine people including Manoj Jarange's brother-in-law deported jalana Administration takes major action against sand mafia | मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

राज्यात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने मोठा कारवाई सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. काल जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. या नऊ आरोपींना जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. 

शरीरसुखाची मागणी नाकारली, विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार; युवकाला अटक

या आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. गोदी पोखरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मनोज जरांगे यांचे सख्खे मेहुणे विलास खेडकर याचाही यामध्ये समावेश आहे. काही आरोपींविरोधात २०१९ पासून गुन्हे दाखल आहेत. आणखी काही प्रस्ताव प्रशासनाने तयार केले आहे. या नऊ आरोपींपैकी सहा आरोपींचा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग आहे. 

मिळालेली माहिती अशी, ही कारवाई अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातील अंबड, घनसावंगी, गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे २०१९ पासूनचे आहेत. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे, यात प्रशासनावरती हल्ला केल्याचे आरोपही आहेत. 

नऊ जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या नऊ जणांपैकी सहा आरोपी हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील आंदोलक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे त्यांचा सख्खा मेहुणा विलास खेडकर याचाही यामध्ये समावेश आहे.  जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 

विलास खेडकर याच्याविरोधात २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. २०२३ मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी ३०७,३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३ मध्ये गोदावरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू  चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २०२३ मध्येच पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने ५०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी  गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यांच्यावर झाली तडीपारीची कारवाई

वामन मसूरराव तौर,रामदास मसूरराव तौर दोघेही रा. शिवनगाव ता. घनसावंगी, संदीप सुखदेव लोहकरे रा. अंबड ता. अंबड, विलास हरीभाऊ खेडकर वय 33 वर्ष रा. गंधारी ता.अंबड,गोरख बबनराव कूरणकर  रा. कुरण ता.अंबड,अमोल केशव पंडीत ,केशव माधव वायभट रा. अंकूशनगर ता. अंबड, गजानन गणपत सोळंके,सुयोग मधूकर सोळंके दोघेही रा. गोंदी ता.अंबड.

Web Title: Nine people including Manoj Jarange's brother-in-law deported jalana Administration takes major action against sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.