शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

गुणांपेक्षा गुणवत्तेला महत्त्व देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:44 AM

विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला, भाषा आणि अन्य क्षेत्रात त्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे, मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगपती राम भोगले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. तुम्हाला परीक्षेत किती टक्के गुण मिळाले यापेक्षा तुम्ही जेथे काम करता तेथे तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळे करता, याला महत्त्व आहे. केवळ इंजिनिअर, डॉक्टर आणि ज्यांना इंग्रजी येते तेच हुशार असतात हा समज दूर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला, भाषा आणि अन्य क्षेत्रात त्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे, ती त्यांनी शोधली पाहिजे, त्यासाठी पालिकांनी मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगपती राम भोगले यांनी केले.रविवारी येथील जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहात जालना एज्युकेशन फाऊंडेशतर्फे जारी करण्यात आलेल्या शब्दकोश अर्थात डिक्शनरीवर आधारित शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. त्यात जालना जिल्ह्यातून विविध शाळांचे जवळपास चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.प्रास्ताविक जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक संचालक प्रा. सुरेश लाहोटी यांनी केले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचे काम करते, त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य कसे वाढविता येईल यावर काम करत असल्याचे लाहोटी म्हणाले.पुढे बोलताना राम भोगले यांनी त्यांचे स्वत:चे उदाहरण दिले. शालेय जीवनात आपण टॉपर नव्हतो. परंतु नंतर त्यात परिश्रम घेऊन यशस्वी उद्योजक झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे केवळ आपल्याला इंग्रजी येत नाही, म्हणून न्यूनगंड बाळगण्याचीगरज नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जालना फाऊंडेशनचा डिक्शनरीच्या उपक्रमांचे त्यांनी स्वागत केले.यावेळी जेईएस महाविद्यालयाचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद लाहोटी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.डॉ. शेट्टीही झाले होते नापासविद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे ही सर्व पालकांची इच्छा असते. परंतु काही विद्यार्थी हे त्यात अपयशी ठरतात. असेच एक उदाहरण म्हणजे भारतातील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी हे देखील वैद्यकीय शिक्षण घेतांना अनेकवेळा नापास झाले होते. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही.आज ते भारतातील क्रमांक एकचे ओपन हार्ट सर्जरी करणारे निष्णात डॉक्टर आहेत. अशी माहिती खुद्द डॉ. देवी शेट्टी यांनी नुकतीच बंगळुरू येथे झालेल्या एका पदीवदान समारंभात दिल्याची माहिती बियाणे उद्योजक समीर अग्रवाल यांनी येथे दिली.वेल्डरला फ्रान्समधून आॅफर : तुमच्याकडे कला असेल तुम्ही कुठेही आपली चुणूक दाखवू शकता. याचे उदाहरण देताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी सांगितले की, आमच्या कंपनीतील एक वेल्डर फ्रान्समध्ये मशीन इस्टॉलमेंटसाठी गेला होता. त्यावेळी त्याचे काम पाहून फ्रान्सच्या कंपनीने त्याला आमच्या येथे नोकरी करण्याची आॅफर दिल्याची माहिती रायठठ्ठा यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनSocialसामाजिक