जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:09 IST2019-06-20T19:08:34+5:302019-06-20T19:09:17+5:30

तरुण रात्री शेतात राखण करण्यासाठी गेला होता

murder of farmer in Jalna; Two suspects detained | जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

गोलापांगरी (जालना) : शेतीच्या वादातून एका २५ वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने वार करुन खून झाल्याची घटना जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (२५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के यानी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्यप्राणी रात्रीच्यावेळी या पिकाची नासदूस करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, अमोलने आवाजाला प्रतिसाद न दिलेल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले असता, अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.  त्यानंतर घटनास्थळी स्वान पथकाने प्राचारण केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन व गोठ्यातील काही वस्तू जप्त केल्या आहे. हा खून शेतीच्या वादातून झाला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
अमोलला दोन भाऊ आहे. एक आपेगाव येथे महाराज आहे. दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे दिवसांपूर्वीच पांडुरंगांच्या वारीला गेले होते.

Web Title: murder of farmer in Jalna; Two suspects detained