जालन्यात व्यापाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:34 IST2018-11-11T00:33:45+5:302018-11-11T00:34:31+5:30

लोखंडी सळ्याचे ब्रोकर सतीश नंदलाल राठी यांना पैशाच्या देवाण-घेवाणीतून चार दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली.

Merchant attacked in Jalna | जालन्यात व्यापाऱ्यावर हल्ला

जालन्यात व्यापाऱ्यावर हल्ला

जालना : येथील लोखंडी सळ्याचे ब्रोकर सतीश नंदलाल राठी यांना पैशाच्या देवाण-घेवाणीतून चार दिवसापूर्वी जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उद्योजक राम अग्रवाल आणि लखन अग्रवाल यांच्या विरूद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार दिवसापूर्वी सतिष राठी आणि अग्रवाल यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सतिष राठी हे लोखंडी सळ्याचे ब्रोकर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे अग्रवाल यांच्याकडे लाखो रूपये थकले होते. वारंवार मागणी करूनही ते मिळत नसल्याने राठी आणि अग्रवाल यांच्यात वाद झाला. या वादातूनच राम अग्रवाल आणि लखन अग्रवाल यांनी त्यांच्या कंपनीत सतिष राठी यांना जबर मारहाण केली. यामध्ये राठी यांच्या डोळ्यासह छातीला मोठी इजा झाली आहे.
याप्रकरणी सतिष राठी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी हा गुन्हा दाखल करताना पोलीसांनी पक्षपात केल्याचा आरोप माहेश्वरी समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून केला.

Web Title: Merchant attacked in Jalna