शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्य निघून गेल्याने सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

बदनापूर : तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सभा ...

बदनापूर : तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सभा सोडून निघून गेले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एक अनपेक्षित घटना असून, निवडणूक निर्णय अधिकारीही भांबावले होते. निवडणूक प्रशिक्षणातही ग्रामपंचायत सदस्य सभेतून निघून गेले तर काय करावे? याची माहिती मिळालेली नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली.

मालेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. येथील सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी आहे. या ग्रामपंचायतमध्ये एकूण सात ग्रामपंचायत सदस्य असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सात सदस्य निवडून आले आहेत. मात्र शुक्रवारी झालेल्या सभेस सहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. एक ग्रामपंचायत सदस्य हजर नव्हते. सरपंचपदाच्या निवडणुकीकरिता वर्षा कृष्णा कडोस व राधाबाई परमेश्वर कडोस व उपसरपंचपदासाठी बाबासाहेब बबन बोरुडे व योगीता अरुण कडोस यांचे उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. दोन्ही पदांकरिता समसमान प्रत्येकी तीन मते मिळाली. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी यापैकी एकही ग्रा.पं. सदस्य तयार नव्हते व उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य सभा सोडून निघून गेले. त्यामुळे ही सभा तहकूब केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. बनसोडे व ग्रामसेवक के. डी. ढाकणे यांनी दिली.

कोट

दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर व ग्रामपंचायत सदस्य निघून गेले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सभास्थळावरून आमच्याकडे ताबडतोब मार्गदर्शनासाठी संपर्क केला नाही. त्यांनी तहसील कार्यालयात येऊन ही माहिती दिली. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी उशीर झाला असता. त्यामुळे आता शनिवारी मालेवाडी ग्रामपंचायतीत सभा आयोजित करण्यात आली आहे.

छाया पवार, तहसीलदार