जालना - लोकांनी उत्साहाने कोरोनावरील लसीकरण करून घ्यावे आणि या संकटावर मात करावी म्हणून जालना येथील गीतकार, अभिनेते विनोद जैतमहाल यांनी नुकताच एका हिंदी गीताचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. कोरोनावरील लस परिणामकारक असून प्रत्येकाने ती आवर्जून घ्यावी, असे आवाहन या गीतामधून त्यांनी केले आहे.
विशाल कांबळे यांचे संगीत, सचिन पडुळ यांची व्हिडिओग्राफी आणि उद्योजक सुनील रायठठ्ठा यांच्या संकल्पनेतून हे गीत साकार झाले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावरून वेगाने शेअर केले जात आहे.
या गाण्याचे चित्रीकरण शहराबाहेर, लसीकरण केंद्रात आणि शहरातील विविध भागांत गेले १५ दिवस सुरू होते. यामध्ये सतीश लिंगडे, सुमित शर्मा, रेखा चव्हाण, शर्मिष्ठा कुलकर्णी यांच्यासह उत्कर्ष थिएटरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे.
कोविड १९ रोगावरील लसीकरण देशभर कमी-जास्त प्रमाणात सुरू आहे. मात्र जनतेच्या मनात अजूनही लसीकरणाबाबत थोडा संकोच आहे. तो दूर व्हावा म्हणूनच या गीतामधून उत्साहजनक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
असे आहे गाणे
अरे हे... कोरोना भगायेंगे
टीका लगवायेंगे...
दूर दूर रहेंगे और मास्क हम लगायेंगे।
रक्षा की ढाल को मजबूत हम बनायेंगे।।
दवा असरदार है,
जरूर लेने जायेंगे
टीका लगवायेंगे
कोरोना भगायेंगे
टीका लगवायेंगे
कोरोना भगायेंगे
बूटी संजीवनी है
जान ये बचाती है,
फरिश्तों की रहमत से
आबे हयात लाये हैं
वक्त ना गँवायेंगे, हाथ हम बढायेंगे
जिन्दगी के आशिक है, मौत को झुकायेंगे
दवा असरदार है,
जरूर लेने जायेंगे
टीका लगवायेंगे
कोरोना भगायेंगे
टीका लगवायेंगे
कोरोना भगायेंगे