माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:47 IST2024-03-04T10:45:47+5:302024-03-04T10:47:01+5:30

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत.

Maratha reservation Allegation of manoj Jarange | माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

वडीगोद्री (जि. जालना) : भाजप कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव असून, हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरवरून होणार होता, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना केला.

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून बॅनर, बोर्ड काढले जात आहेत, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: Maratha reservation Allegation of manoj Jarange