शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

हरवलेला संवाद अन् ताणतणावामुळे अनेकांना मानसिक आजाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 1:13 AM

विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्पर्धेच्या युगात सोयी-सुविधा वाढत असल्या तरी कौटुंबिक, सामाजिक संवाद कमी होऊ लागला आहे. परिणामी विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रूग्णालयात गत सहा महिन्यात विविध मानसिक आजारांनी त्रस्त झालेल्या पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.स्पर्धेच्या युगात मानवाचे जीवनमान पूर्णत: बदलून गेले आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत काम आणि सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या अनेकांना विविध मानसिक आजारांनी ग्रासले आहे. दैनंदिन ताणतणाव, शेतीतील उत्पन्न घटने, कर्जाचा बोजा वाढणे, उत्पन्नाची इतर साधने नसणे, दीर्घकालीन आजार, सतत होणारे कौटुंबिक वाद यासह इतर अनेक कारणांनी विविध मानसिक आजार जडणा-या रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. मानसिक आजारांनी ग्रासलेले रूग्ण अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे अशा रूग्णांवर वेळेत आणि नियमित औषधोपचार घेण्याची गरज आहे.जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार विभागातील अंतररूग्ण व बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंत पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात बाह्यरूग्ण विभागात नियमित येणारे ७९३ तर नवीन २८७ रूग्ण उपचार घेत आहेत. अंतररूग्ण विभागात ३९२८ रूग्ण नियमित उपचार घेत आहेत. मानसिक आजार किती प्रमाणात आहे, त्यानुसार रूग्णावर दोन वर्षे ते पाच वर्षापर्यंत उपचार केले जातात. अनेक आजारात आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात.मानसिक आजाराची लक्षणेअवास्तव भीती वाटणे, चिडखोरपणा वाढणे, झोपेची गरज कमी होणे, विनाकारण धोका पत्करणे, सतत चिंताग्रस्त राहणे, उदासिन राहणे, उन्मादपणा वाढणे, व्यसनाधीनता वाढणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत. तसेच लहान मुलांमध्ये मतिमंदपणा, झोपेत दचकून उठणे, अडखळत बोलणे, बालगुन्हेगारी, रात्री झोपेत चालणे आदी.असे राहील मानसिक आरोग्य उत्तमसंतुलित व योग्य आहार घ्यावा, नियमित व्यायाम, योगा करावा, पुरेशी झोप घ्यावी, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवावा, आशावादी-सकारात्मक विचार करावेत, सामाजिक संबंध ठेवावेत, भावनिक नियंत्रण मिळवावे, अति संवेदनशीलता टाळावी, स्वत:च्या मूल्यांचा शोध घ्यावा तसेच निर्व्यसनी राहिले तर मानवाचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यmental hospitalमनोरूग्णालयHealthआरोग्य