आज हसरं बाळ, सुदृढ बाळ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:57 IST2018-08-03T23:55:26+5:302018-08-03T23:57:27+5:30
काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज हसरं बाळ, सुदृढ बाळ उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे दु. ४ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. नव्हे तिचा तो नवा जन्मच असतो. त्यानंतर सुरू होते आई- बाळाचे वात्सल्याचे नाते. बाळ जन्मल्यापासून ते स्वत:ची काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत त्याची वाढ व विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते.
या काळात बाळाच्या संगोपनात, वात्सल्याचा वर्षाव करण्यात माता तहान- भूक, दिवस- रात्र विसरून जाते. बाळाची तब्येत थोडीशी खराब झाली किंवा झोप पुर्ण होत नसेल किंवा तो चिडचिडा झाला तर आईची काळजी वाढते. अनेकदा कपडे ओलसर असल्यानेही बाळची चिडचिड वाढते.
अशा वेळेस त्यास पॅम्पर्स पॅन्ट्स घातली तर तो कोरडेपणा अनुभवून निवांत झोपेल. अशा एक ना अनेक समस्या चुटकीसरशी सोडविण्यासाठी खास लोकमत व पॅम्पर्स ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ हा उपक्रम आपणासाठी घेऊन आले आहेत.
आपल्या व आपल्या बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी या कार्यक्रमाची अनुभूती प्रत्येक आर्ईने घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला एक भेटवस्तू मिळणार आहे. आकर्षक वेशभुषा सादर करणाºया आई आणि बाळाला ‘फॅशन वॉक’ ची संधी भेटणार आहे.
महिलांसाठी खेळ
महिलांसाठी विविध खेळ- या कार्यक्रमात सहभागी होणाºया महिलांसाठी ‘वन मिनिट गेम शो’ ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजयी ठरणाºया महिलांना भरपूर बक्षिसे मिळविण्याची संधी मिळणार आहे.
सेल्फी प्रदर्शन
‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या उपक्रमांतर्गत बाळ आणि आई या दोघांच्या ‘सेल्फी’ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात हे प्रदर्शन भरविण्यात येईल.
डॉ. जयंत तुपकरी यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमांतर्गत बालरोग तज्ञ डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. औरंगाबाद बालरोग संघटनेचे माजी अध्यक्ष असणाºया डॉ. तुपकरी यांना या क्षेत्राचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून ते या संदर्भातील त्यांचे अनुभव तसेच बाळाचे संगोपन या विषयी बोलतील.