धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:51 IST2019-06-04T00:50:47+5:302019-06-04T00:51:03+5:30
दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.

धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
तालुक्यामधील दुधना काठच्या बाबूलतारा, अंबा, रोहीणा, कोरेगाव, पाडळी आदी गावांना पाण्याचा बारा महिने सुकाळ आहे. या गावांना पाणी टंचाई म्हणजे काय माहीतच नाही. केवळ तांत्रीक अडचणी आल्या तरच. कारण, सतत निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरने हे पात्र भरलेलेच रहायचे. विस फुटाहून अधीक पाणी रोहीणा पुलाखाली असायचे.
या पाण्यावर गावातील महीला धुणे धूवून जात, मुलं, तरूण या ठिकाणी असलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असत, मात्र, आता बॅक वॉटर खाली गेल्याने हे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे या गावालाच आता पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
डबडबलेल्या पाण्यात धुणे धुणा-या महिलांना आता धुणे धुण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या गळती लागलेल्या व्हॉल्वचवा आधार घेण्याची वेळ आली असून रोहणा गावाजवळ गळती लागलेल्या व्हॉल्ववर धुणे धुण्यासाठी महिला गर्दी करत आहेत.