शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

अमोल राऊत तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊन वर्ष उलटले, तरीही केंद्रात सोईसुविधांचा अभाव ...

अमोल राऊत

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊन वर्ष उलटले, तरीही केंद्रात सोईसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना उपचाराची खरी गरज आहे.

तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर व तत्कालीन आरोग्य सभापती ए.जे. बोराडे, उद्धव पवार व सुदाम सरकटे यांनी विशेष प्रयत्न केले होते. आ.बबन लोणीकर यांनी वेगाने इमारतींचे काम पूर्ण केले. तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलोरा, वझर सरकटे, देवठाणा, उस्वद, तळणी, शिरपूर हे सहा उपकेंद्राचा समावेश आहे, तर या केंद्रांतर्गत २५ गावांतील नागरिकांना आरोग्याची सेवा दिली जाते. सध्या या रुग्णालयात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही, विविध मशनरी, फर्निचर नाही. विशेषत: रुग्णांसाठी महत्त्वाची असलेली १०८ रुग्णवाहिका नाही. आणीबाणीच्या वेळी इतर ठिकाणची रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनांचा आधार रुग्णांना घ्यावा लागत आहे. प्रसूतीची सुविधा नाही, कर्मचाऱ्यांना बसायला खुर्च्या व फर्निचर नाही, पुरेसे मेडिसिन उपलब्ध नाही, बरेचसे कर्मचारी अतिरिक्त जबाबदारीवर काम करीत आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये २ वैद्यकीय अधिकारी, १ जीएनएम, २ आरोग्यसेविका, ४ आरोग्यसेवक, १ औषधी निर्माता, १ सुपरवायझर व २ शिपाई असणे गरजेचे आहे. एकूणच सोईसुविधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, यामुळे या केंद्रातील कामकाज विस्कळीत झाले असून, रुग्णासह नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तळणीचे प्राथमिक आरोग्य केंद्र ऑनलाइन नाही. दहिफळ खंदारे व बैलोरा येथील आरोग्य केंद्रातून औषधी आणून तात्पुरती सेवा दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर माउली सरकटे यांनी केला.

तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या संदर्भात बोलून अपेक्षित सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासंबधी प्रयत्न करू, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी सांगितले.

तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपेक्षित सोईसुविधांचा अभाव असला, तरी येणाऱ्या रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे तळणीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनील मगर यांनी सांगितले.