जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:24 IST2019-06-14T00:23:58+5:302019-06-14T00:24:29+5:30

कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली.

Jeep shot dead two wheelers | जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वडीगोद्री : कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली.
अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील अरुण ज्ञानेश्वर मिठ्ठे, वय ४८ वर्षे, हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२१ एफ.४६८२ वरुन वडीगोद्री येथून स्वत: च्या दुचाकीवर जात होते. बरसवाडा फाट्याजवळ रस्ता ओलांडत असतांना समोरून बीड येथून औरंगाबादकडे जात असलेल्या कार क्रमांक एम.एच.४१ एस.०८७८ या गाडीने जोराची धडक दिल्याने अरुण मिठे हे जागीच ठार झाले. अपघात घडताच कारचालकाने तेथून पळ काढला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गाडीची तोडफोड केली.हा अपघात एवढा भीषण होता की, मिठे हे कारच्या चाकात अडकून जवळपास शंभर ते १५० फूट फरटत गेल्यानेच ते जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, चालकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Jeep shot dead two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.