जामवाडीतील जमीन संपादनाचा तिढा सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:23 IST2018-02-05T00:23:33+5:302018-02-05T00:23:37+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातल्या जामवाडी, गुंडेवाडी शिवारात संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

जामवाडीतील जमीन संपादनाचा तिढा सोडविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातल्या जामवाडी, गुंडेवाडी शिवारात संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी रविवारी जामवाडी, गुंडेवाडी परिसरात समृद्धी महामार्गात जाणा-या जमिनीची पाहणी केली.
समृद्धी महामार्गावर जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर येथे नवनगर प्रस्तावित असून या गावांतील शेतजमिनीवर तसे आरक्षण टाकण्यात आले आहे. गुडेवाडी शिवारातील नियोजित इंटरचेंज पॉइंटसाठी (चढ-उतार स्थळ) याभागातील दोनशे एकर शेतजमीन प्रस्तावित आहे. यासाठी वर्षभरापूर्वी प्रगटन प्रसिद्ध केले असून त्यात गावच्या गटांचा समावेश आहे.