शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

श्रीराम लागूंच्या आठवणींना जालनेकरांनी दिला उजाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:46 AM

प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली.

लोकमत न्य्ाूज नेटवर्कजालना : प्रसिध्द नाट्य तसेच चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळात सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. श्रीराम लागू हे तीन वेळेस जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जेईएस महाविद्यालच्या स्नेहसंमलनास हजेरी लावण्यासह सामाजिक कृतज्ञता समग्र निधी जमा करण्यासाठी ते जालन्यात आल्याची आठवण चित्रपटप्रेमी आणि शायर अनुराग कपूर यांनी सांगितली.डॉ. श्रीराम लागू हे जालना येथील जेईएस महाविद्यालयात साधारपणे १९८७ मध्ये वार्षिक स्रेहसंमलनास आले होते. त्याच वेळी त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक सादर करून जालनेकर रसिकांना खिळवून ठेवले होते, अशी आठवण प्रा. संजय लकडे यांनी सांगितली. तसेच दुसºया एका कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू तसेच प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर, अभिनेत्री तनुजा व अन्य कलाकार हे १९८५ मध्ये सामाजिक कृतज्ञता निधी जमा करण्यासाठी जालना दौºयावर आले होते. त्यावेळी कै.वसंत गोरंट्याल यांनी या सर्व कलावंतांच्या निवासाची व्यवस्था हॉटेल अंबरमध्ये केली होती. त्यावेळी अनुराग कपूर यांच्या नवचेतन युवा ग्रुपने देखील यात आपले योगदान दिल्याचे कपूर म्हणाले. आमच्या नवचेतन ग्रुपमध्ये २५ पेक्षा अधिक युवकांचा समावेश होता.ज्यावेळी लागू यांची भेट घेऊन आम्ही निधी जमा केला असताना त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केल्याचे आजही आपल्याला चांगले आठवत असल्याचे कपूर म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत अनिल चोरडिया, सुनील चोरडिया, राजेश लखोटिया, जयेश पहाडे, आनंद लुणिया, गुरूदत्त यमूल आदींची उपस्थिती होती. दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमानिमित्त श्रीराम लागू आणि कै. नरेंद्र दाभोळकर हे जालन्यातील जैन इंग्रजी शाळेजवळील महावीर मंगल कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी देवाला रिटायर केलेच पाहिजे या बद्दल सांगितले होते. तसेच मूर्ती पूजा कशी चुकीची असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रस्ता ओलांडताना एका लहान मुलाचा अपघात होतो, आणि तो देखील एका मंदिरासमोर झालेला असतो, जर देव असताच तर या मुलाचे प्राण तो का वाचवू शकला नाही असे सांगून त्यांनी देवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना आव्हान दिल्याची आठवण त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्णा नायगव्हाणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली.

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूcultureसांस्कृतिकSocialसामाजिक