जालना पोखरात घोटाळा : नियमबाह्य ६४ लाखांचे अनुदान वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:07 IST2026-02-14T16:07:17+5:302026-02-14T16:07:34+5:30

कंत्राटी लेखाधिकाऱ्यांनी ३९ लाभार्थींना जास्तीचे अनुदान केले वाटप

Jalna Pokhara Scam: Case filed against two for distributing illegal grant of Rs 64 lakhs | जालना पोखरात घोटाळा : नियमबाह्य ६४ लाखांचे अनुदान वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

जालना पोखरात घोटाळा : नियमबाह्य ६४ लाखांचे अनुदान वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

जालना : पदाचा गैरवापर करून पोखरातील शेडनेटच्या लाभार्थींना जास्तीचे ६४ लाख ४ हजार ५५४ रुपयांचे अनुदान नियमबाह्य वाटप केल्याप्रकरणी दोन कंत्राटी लेखाधिकाऱ्यांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष उत्तमराव यशवंतकर (रा. जालना) व आकाश भास्कर टाक (रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी फिर्याद दिली. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यांत पोखरा प्रकल्पामध्ये शेडनेट उभारणी हा घटक राबविण्यात येत असून, सदरील घटकाच्या अंमलबजावणीमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय दक्षता पथकाने तपासणी अहवाल शासनास सादर केला होता. त्यात ५८ लाख ७८ हजार ९३५ रुपये रक्कम पात्र दर्शविली आहे. त्याप्रमाणे शेडनेट या घटकाचे लेखापरीक्षण मुंबई येथील पोखराचे प्रकल्प संचालक यांनी करून दि. ५ जुलै २०२४ रोजी राज्य शासनास अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये ३९ लाभधारकांचे अंतिम देयके ही त्यांना देण्यात आलेल्या पूर्व संमती दिनांकाच्या पूर्वीची असल्याने त्याची नियमबाह्य परीपूर्ती केल्याकारणाने लाभार्थींना प्रदान करण्यात आलेले अनुदान रक्कम २ कोटी ४६ लाख ५१ हजार ८१५ रुपये वसूल पात्र ठरविले होते.

या प्रकरणातील वसुली दर्शविलेल्या अधिकाऱ्यांपैकी कंत्राटी लेखाधिकारी सुभाष यशवंतकर व आकाश टाक यांना वगळता इतर अधिकारी हे शासकीय सेवेतील नियमित अधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९८९ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्या दोघांवर ही कारवाई शक्य नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

रक्कम वसुलीची नोटीसदेखील बजावली
सुभाष उत्तमराव यशवंतकर (रा. जालना) व आकाश भास्कर टाक (रा. परभणी) यांनी ६४ लाख ४ हजार ५५४ रुपयांचे अनुदान नियमबाह्य वाटप केले असून, त्यांना रक्कम वसुलीची नोटीसदेखील बजावण्यात आलेली आहे. त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. शिवाय, रकमेचा शासनाला भरणा केला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सदर बाजार ठाण्याचे सपोनि. साबळे यांनी दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : जालना पोखरा घोटाला: अवैध अनुदान वितरण पर मामला दर्ज

Web Summary : पोखरा परियोजना अनुदान में अवैध रूप से ₹64.04 लाख वितरित करने पर दो संविदा अधिकारियों पर आरोप लगे हैं। कथित तौर पर जालना, बदनापुर, भोकरदन और जाफराबाद में मानदंडों का उल्लंघन किया, जिसके बाद राशि चुकाने में विफल रहने पर पुलिस जांच शुरू हुई।

Web Title : Jalna Pokhara Scam: FIR Filed for Illegal Grant Distribution

Web Summary : Two contract officers face charges for illegally distributing ₹64.04 lakh in Pokhara project grants. They allegedly violated norms in Jalna, Badnapur, Bhokardan, and Jafrabad, prompting a police investigation after failing to repay the amount.