शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ६१ टक्के मतदान : नेत्यांसह उमेदवारांचा जीव टांगणीला, आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:20 IST

बोगस मतदान प्रकरणात एकावर गुन्हा, एक जण ताब्यात

जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत गुरुवारी १५ जानेवारी रोजी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोगस मतदानाचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणार असून, नेत्यांसह उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

जालना महानगरपालिकेची १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी प्रथमच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादीने (अजित पवार) मनसेसोबत युती केली आहे, तर महाविकास आघाडीची एक मोट मात्र कायम आहे. प्रचाराची रणधुमाळी शमल्यानंतर उमेदवारांसह नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटींवर भर दिला होता. शहरातील २९१ मतदान केंद्रांवर गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी ९:३० वाजेपर्यंत मतदानाची गती संथ होती. नंतर हळूहळू मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर झाली. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

बोगस मतदानाचा प्रयत्न

कचेरी रोडवरील बुथ क्रमांक १४/१२ मध्ये अब्दुल मलिक अब्दुल बारी (रा. अंबडनाका, जालना) यांचे डमी मतदान कार्ड वापरून रहिस पठाण इसार पठाण (वय-२५, रा. मोहमदियानगर, सिल्लोड) हा आला. मतदान अधिकाऱ्यांनी बोगस मतदानाचा प्रकार ओळखून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात डॉ. कृष्णा देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रहिस पठाण विरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर प्रभाग ९ ड मध्ये एका व्यक्तीने बोगस मतदान केल्याची तक्रार उमेदवाराने केली होती. डीवायएसपी अनंत कुलकर्णी व सहकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Elections: 61% Voter Turnout, Results Awaited Anxiously Today

Web Summary : Jalna saw 61% voter turnout in municipal elections. One person was arrested for attempted fraudulent voting. Results are due today, leaving candidates and leaders in anticipation.
टॅग्स :Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Votingमतदान