शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

(संजय लव्हाडे) जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास ...

(संजय लव्हाडे)

जालना, दि.१४ : खाजगी व्यापारी कापसाला अधिक चांगला भाव देत असल्याने शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यास अनुत्सुक आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सीसीआयचे खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. किराणा व धान्य बाजारात ग्राहकी चांगली असून, धान्य मालाचे भाव स्थिर, तर बहुतांश किराणा मालाच्या दरात तेजी आहे. सोने तोळ्यामागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, चांदीचे दर स्थिर आहेत.️ सीसीआयच्या तुलनेत खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना सोयीचे आणि फायदेशीर वाटू लागले आहे. सीसीआयकडे कापसाचा खरेदी दर ५,७२५ रुपये, तर खाजगी व्यापाऱ्यांकडे ६,००० ते ६,१०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. सीआयकडे कापसाच्या पैशासाठी थांबावे लागते, तर खाजगी व्यापारी लगेच कापसाचे पैसे देतात. या कारणामुळे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्रात शेतकरी फिरकेनासे झाले. यामुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. सर्व प्रकारचे खाद्यतेल क्विंटलमागे २०० रुपयांनी महागले. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या भडकलेल्या किमती आणि स्थानिक बाजारात तेलाची वाढती मागणी यामुळे तेलाच्या दरात तेजी आली. पामतेल ११,७००, सोयाबीन तेल १२,१००, सरकी तेल १२,००० आणि करडी तेलाचे दर १७,००० ते १८,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तूप महागले असून, डब्यामागे १०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव १,४५० ते १,७०० रुपये प्रतिडबा असे आहेत. शेंगदाण्यात १०० रुपयांची, साबुदाण्याच्या दरात ४०० रुपयांची तेजी आली. शेंगदाण्याचे दर ८,५०० ते १०,०००, तर साबुदाण्याचे दर ४,५०० ते ५,२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. नवा गहू आणि ज्वारी बाजारात आली आहे. गव्हाची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव स्थिर म्हणजे १,६५० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ४०० पोती असून, भाव १,३०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तुरीची आवक दररोज ३ हजार पोती असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६,४०० ते ७,१५१ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. अर्थसंकल्पातील जीएसटीच्या नियमांतील नव्या तरतुदींमुळे उद्योजक, व्यापारी, सीए, कर सल्लागार आदी सर्वच जण धास्तावले आहेत. टॅक्स चोरी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटमधील घोटाळे थांबवण्यासाठी शासनाने ज्या उपाययोजना अवलंबिल्या आहेत, त्या जाचक असल्याचे बहुतांश करदात्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोती असून, १०० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४,५५० ते ४,६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, दर ४९,२०० रुपये प्रतितोळा आहे. चांदीचा दर स्थिर म्हणजे ७१,५०० रुपये प्रतिकिलो असा आहे.