धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:30 IST2026-02-27T16:26:09+5:302026-02-27T16:30:02+5:30

महावीर चौकातील कपड्याच्या दुकानात पोलिसांची धाड; २१ धारदार तलवारींसह व्यापाऱ्याला अटक

Jalna Crime: 21 Swords Seized from Clothing Store in Mahavir Chowk; Merchant Arrested | धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

जालना: शहरातील गजबजलेल्या महावीर चौक परिसरात एका रेडीमेड कपड्याच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल २१ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही धाड टाकली. या कारवाईने व्यापारी वर्तुळात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीने फुटले भांडं
महावीर चौकातील 'जय माता दी मेन्स वेअर' या दुकानात अवैधरीत्या शस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले. पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी पथकासह दुकानात छापा टाकला असता, तिसऱ्या मजल्यावर तलवारींचे घबाड हाती लागले.

२१ तलवारी जप्त, व्यापारी ताब्यात
दुकानाची झडती घेतली असता, पोलिसांना १३ मोठ्या आणि ८ लहान अशा एकूण २१ स्टीलच्या धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींच्या मालकीबाबत दुकानदार मनीष दिलीप निहलानी (वय ४३, रा. अजिंठा नगर) याच्याकडे परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुमारे २५,९०० रुपये किमतीच्या या तलवारी जप्त केल्या असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप भारती, सपोनि सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तलवारी कशासाठी आणि कुठून आणल्या होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title : जालना: रेडीमेड कपड़ों की दुकान से 21 तलवारें जब्त; व्यापारी गिरफ्तार

Web Summary : जालना में महावीर चौक स्थित एक रेडीमेड कपड़ों की दुकान से पुलिस ने 21 तलवारें जब्त कीं। दुकानदार मनीष निहलानी को गिरफ्तार किया गया। उसके पास हथियारों का परमिट नहीं था। पुलिस स्रोत और इच्छित उपयोग की जांच कर रही है।

Web Title : Jalna: 21 Swords Seized from Clothing Store; Merchant Arrested

Web Summary : Police in Jalna seized 21 swords from a readymade garment shop in महावीर चौक. The shopkeeper, Manish Nihlani, was arrested. He lacked permits for the weapons. Police are investigating the source and intended use.