शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: 'तलाठी प्रतिसाद देत नाहीत, पंचनामे कधी करणार?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:02 IST

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन; ‘कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान पंचनाम्याविना राहणार नाही, दिवाळीपूर्वी मदत देणार’

बदनापूर (जालना): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी येथे आले असता, त्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. तलाठी पंचनाम्यासाठी येत नाहीत, पंचनामे होऊनही मदत मिळत नाही, अशा तक्रारी करत शेतकऱ्यांनी ‘सरसकट नुकसान भरपाई’ची मागणी लावून धरली.

'आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही'गेवराई बाजार शिवारात पाहणी सुरू असताना एका शेतकऱ्याने थेट मंत्र्यासमोरच आपली व्यथा मांडली. “माझी एक एकर शेती असून, जर मला नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असे तो शेतकरी म्हणाला. या विधानाने कृषीमंत्री आणि उपस्थित अधिकारीही काही काळ अवाक् झाले. शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनावर रोष व्यक्त केला. गुडघाभर पाणी साचलेल्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते.

पंचनामे तातडीने करण्याचे आदेशशेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात ६ लाख ३५ हजार एकर, तर राज्यात ८० लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाला मी सूचना देतो की, नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचे पंचनामे झालेच पाहिजेत. एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये. खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा.”

दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासनमदतीबद्दल बोलताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर १० दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. अशा संकटाच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने वागावे.” आमदार नारायण कुचे यांनीही शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, सरपंच संतोष नागवे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfloodपूर