शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: फेरफार नोंद घेण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:41 IST

याप्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जालना : वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीची वारसा हक्काने फेरफार नोंद घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिंधी काळेगाव येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. गजानन मनसाराम बारवाल (वय ३६) असे लाच स्वीकारणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे.

४२ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या नावे असलेली वडिलोपार्जित शेती वारसा हक्काने नावावर करण्यासाठी आणि फेरफार नोंद घेऊन फाईल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराने २७ जानेवारी रोजी कागदपत्रे सादर केली होती. मात्र, हे काम करण्यासाठी तलाठी गजानन बारवाल याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी २८ जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी बारवाल याने तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. 

जालना येथील रूपनगर भागात गाळा भाड्याने घेऊन तिथे तलाठी सज्जा कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयासमोर असलेल्या रोडवर बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने बारवाल याला पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेचे ३ हजार रुपये, वैयक्तिक खर्चाचे ३ हजार १२० रुपये आणि एक वन-प्लस कंपनीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, याप्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Official Caught Red-Handed Accepting Bribe for Land Mutation

Web Summary : A Talathi in Jalna was arrested for accepting a ₹3,000 bribe to process a land mutation. The Anti-Corruption Bureau caught him red-handed after a complaint.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभाग