जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:40 IST2019-01-31T18:39:35+5:302019-01-31T18:40:46+5:30

औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री चंदनझिरा पोलिसांनी छापा मारुन ५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. 

In Jalana police raid on gambling place; Five people were arrested | जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

जालना : औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री चंदनझिरा पोलिसांनी छापा मारुन ५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. 

ज्ञानदेव दामोधर विघ्ने (रा. मंगरुळ जि. अहमदनगर), गणेश मारोतीराव पळसे (रा. मोतीबाग), अब्दुल राऊफ सय्यद अब्दुला (रा. माजलगाव जि. नाशिक), बबलू आतार, आकाश पवार (दोघे रा. चंदनझिरा) असे संशयित आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार साहित्य, असा ३२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

जालना - औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन सदर ठिकाणी छापा मारला असता, येथे ५ जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रोख रक्कम १६,१५०  व जुगार साहित्य असा एकूण ३७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या पाच जणांविरुध्द चदंनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ही कारवाई पोउपनि. प्रमोद बोण्डले, कर्मचारी प्रभाकर वाघ, नंदलाल ठाकूर, अनिल काळे, कृष्णा भडांगे, भारत कडूळे, परमेश्वर हिवाळे यांनी केली.

Web Title: In Jalana police raid on gambling place; Five people were arrested