Jalana: काळजाचा थरकाप! वाटूरमध्ये कागदात गुंडाळून नवजात अर्भक फेकले, उपचारापूर्वी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:51 IST2026-02-06T17:50:40+5:302026-02-06T17:51:14+5:30

दोषींना शोधून काढणार! पोलिसांनी जपले मृत अर्भकाचे डीएनए सॅम्पल; तपास वेगाने सुरू.

Jalana: Heartbreaking! Newborn baby wrapped in paper thrown in Watoor main chowk, dies before treatment | Jalana: काळजाचा थरकाप! वाटूरमध्ये कागदात गुंडाळून नवजात अर्भक फेकले, उपचारापूर्वी अंत

Jalana: काळजाचा थरकाप! वाटूरमध्ये कागदात गुंडाळून नवजात अर्भक फेकले, उपचारापूर्वी अंत

- अझहर शेख
वाटूर (जालना):
जालना जिल्ह्यातील वाटूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुख्य चौकातील एका बेकरीच्या पायरीवर शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास एक नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस अवस्थेत आढळले. दुर्दैवाने, या निष्पाप जिवाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या अर्भकाला कागदात गुंडाळून 'के.व्ही.के बेकरी'च्या पायरीवर ठेवले होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. अर्भकाला तातडीने वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र दुपारी १२:४५ वाजता डॉ. प्रियंका माटे यांनी सदर अर्भक मृत झाल्याचे घोषित केले.

'डीएनए' नमुने राखून ठेवले
घटनेचे गांभीर्य ओळखून परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि एपीआय बी. एम. वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृत अर्भकाचे जिल्हा रुग्णालय जालना येथे शवविच्छेदन करण्यात आले असून, दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 'डीएनए' नमुने राखून ठेवले आहेत.

सीसीटीव्हीवर पोलिसांची नजर 
हे अर्भक त्या ठिकाणी कोणी आणून ठेवले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता परिसरातील सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या निर्दयी कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

Web Title : जालना: नवजात शिशु लावारिस मिला, मौत; पुलिस ने की जांच

Web Summary : जालना के वाटूर में एक बेकरी के पास एक नवजात बच्ची लावारिस मिली। कागज में लिपटी हुई, शिशु की इलाज से पहले ही दुखद मृत्यु हो गई। पुलिस सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है और इस अमानवीय कृत्य के अपराधी की पहचान करने के लिए डीएनए नमूने एकत्र कर रही है।

Web Title : Jalana: Newborn Found Abandoned, Dies; Police Investigate Heartless Act

Web Summary : A newborn girl was found abandoned near a bakery in Watur, Jalana. Discovered wrapped in paper, the infant tragically died before receiving treatment. Police are investigating, reviewing CCTV footage and collecting DNA samples to identify the perpetrator of this inhumane act.