Jalana: ३९ लाखांच्या खंडणीच्या पैशांतून घेतले सोन्याचे दागिने अन् कॅमेरा; तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:40 IST2025-06-26T14:34:45+5:302025-06-26T14:40:01+5:30

२१ लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

Jalana: Gold ornaments and camera taken from ransom money; Three arrested | Jalana: ३९ लाखांच्या खंडणीच्या पैशांतून घेतले सोन्याचे दागिने अन् कॅमेरा; तिघे जेरबंद

Jalana: ३९ लाखांच्या खंडणीच्या पैशांतून घेतले सोन्याचे दागिने अन् कॅमेरा; तिघे जेरबंद

जालना : एलसीबीच्या पथकाने खंडणी प्रकरणात मंगळवारी सायंकाळी तिघांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २१ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने आणि कॅमेराही पोलिसांनी जप्त केला आहे.

करण विलास निकाळजे (वय २५), नीलेश रावसाहेब निकाळजे (वय २५, दोघे रा. तांदूळवाडी, ता. जालना), मयूर कुंडलिक निकम (वय २१, रा. कन्हैय्यानगर, जालना) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. जालन्यातील संस्थाचालक रवी प्रदीप खोमणे यांनी खंडणी प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा शोध घेत असताना मंगळवारी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर संबंधितांनी गुन्ह्याची कबुली देत ७ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड, दहा लाखांची कार, पिस्टलसारखे दिसणारे लायटर, खंडणीच्या पैशांतून खरेदी केलेले १ लाख ७ हजारांचे सोन्याचे दागिने, २ लाख ५ हजारांचा कॅमेरा असा एकूण २१ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांना मुद्देमालासह चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, देविदास भोजने, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, चालक साैरभ मुळे यांच्या पथकाने केली.

३९ लाख घेतले, नंतर ७० लाख मागितले
समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी ३९ लाखांची खंडणी चेक आणि रोख स्वरूपात घेण्यात आली. नंतर करण निकाळजेचा मामा सुरेश खंडागळे, त्याचा मुलगा गौरव उर्फ बंटी खंडागळे यांनी तक्रार अर्ज करीत तो मागे घेण्यासाठी ७० लाखांची खंडणी मागितली, अशी तक्रार रवी खोमणे यांनी दिली होती. या प्रकरणात करण निकाळजे, सुरेख खंडाळे, गौरव खंडाळे, रूपेश निकाळजे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: Jalana: Gold ornaments and camera taken from ransom money; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.