Jalana: ट्रॅक्टर कालव्यात उलटून शेतकऱ्याचा मृत्यू; घरातील कर्ता गेल्याने कुटुंब उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:26 IST2025-06-24T17:26:01+5:302025-06-24T17:26:33+5:30

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारातील घटना

Jalana: Farmer dies after tractor overturns in canal; Family left in the lurch after the breadwinner passes away | Jalana: ट्रॅक्टर कालव्यात उलटून शेतकऱ्याचा मृत्यू; घरातील कर्ता गेल्याने कुटुंब उघड्यावर

Jalana: ट्रॅक्टर कालव्यात उलटून शेतकऱ्याचा मृत्यू; घरातील कर्ता गेल्याने कुटुंब उघड्यावर

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, मंगळवारी ( दि. २४ )  दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाला. अण्णासाहेब नामदेव गव्हाणे ( ३७, रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी अण्णासाहेब गव्हाणे हे मंगळवारी सकाळी बटईने केलेल्या शेतात कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. काम आटोपून परत येत असताना घुंगर्डे हादगाव ते तीर्थपुरी रोडवर नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर रोडच्या शेजारील पाण्याच्या चारीमध्ये उलटला. यामध्ये गव्हाणे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबतचा गोपाल विष्णू पवार ( 13  रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) हा गंभीर जखमी झाला.

माहिती कळताच या अपघातस्थळी घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ट्रॅक्टर खाली दबलेला गव्हाणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. तर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी अंबड येथे हलवण्यात आले आहे. मयत अण्णासाहेब गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गव्हाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Jalana: Farmer dies after tractor overturns in canal; Family left in the lurch after the breadwinner passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.