'दागिने काढून ठेवा, खून होईल!'; तोतया पोलिसाने भीती दाखवत वृद्धेचे ७ लाखांचे दागिने लंपास केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:05 IST2026-03-20T13:04:27+5:302026-03-20T13:05:15+5:30

पोलिस असल्याची बतावणी करून पाच तोळ्यांचे दागिने लांबविले

Jalana Crime: 'Take off your jewelry, you will be killed!';Fake Cop Steals 5 Tolas of Gold Jewels from Elderly Couple in Jalna | 'दागिने काढून ठेवा, खून होईल!'; तोतया पोलिसाने भीती दाखवत वृद्धेचे ७ लाखांचे दागिने लंपास केले

'दागिने काढून ठेवा, खून होईल!'; तोतया पोलिसाने भीती दाखवत वृद्धेचे ७ लाखांचे दागिने लंपास केले

भोकरदन (ता. जालना) : पोलिस असल्याचे सांगून अज्ञात भामट्याने वृद्ध दाम्पत्याचे ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी बोरगाव जहांगीर येथे घडली. या प्रकरणी इंदुबाई साहेबराव काळे यांनी भोकरदन ठाण्यात तक्रार दिली आहे.

इंदूबाई काळे या पती साहेबराव काळे यांच्यासह गुरुवारी सकाळी बोरगाव जहागीर येथील नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. ते सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास सिपोरा बाजार येथील बसस्थानकावर उतरले. बोरगाव जहागीरकडे पायी जाताना एक अनोळखी इसम दुचाकीवरून आला. त्याने पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी या परिसरात अंगावरील सोन्याच्या दागिन्यांमुळे महिलेचा खून झाला. तुम्ही अंगावरील सोन्याचे दागिने काढून बॅगेत ठेवा, असा सल्ला त्याने दिला.

भामट्याने दोघांनाही बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने काढून घेतले. यामध्ये चैन, अंगठी व महिलेच्या गळ्यातील पोत असे चार तोळे पाच ग्रॅमच्या दागिन्यांचा समावेश आहे. नंतर काही क्षणातच दुचाकीवरून पसार झाला. घटनेनंतर दाम्पत्याने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटा पळाला.७ लाखांचे दागिने लंपासजुन्या भावाने सदरील दागिन्यांची किंमत १ लाख ६३ हजार रुपये आहे तर नवीन भावाने ७ लाख रुपये आहे. या प्रकारानंतर येथील नागरिकांनी भोकरदन ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना फोन करून माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक नेटके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर प्रकरणात भोकरदन ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title : नकली पुलिसवाले ने लाखों के गहने लूटे, बुजुर्ग महिला शिकार

Web Summary : जालना के बोरगाँव जहांगीर में एक नकली पुलिसकर्मी ने एक बुजुर्ग दंपत्ति को गहने उतारने के लिए कहा और 7 लाख रुपये के गहने चुरा लिए। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Fake Cop Robs Elderly Woman of Jewelry Worth Lakhs

Web Summary : A conman posing as a police officer in Borgaon Jahangir, जालना, tricked an elderly couple into removing their jewelry, claiming it was unsafe. He then stole ornaments worth ₹7 lakhs. Police are investigating the theft.