नियम तोडला, कार धडकल्या; ७ ठार, मृतांमध्ये मालाडच्या तिघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 05:54 IST2024-06-30T05:54:22+5:302024-06-30T05:54:54+5:30

समृद्धीवर भीषण अपघात.

jalana accident Rules are broken, cars collide 7 killed, including three from Malad | नियम तोडला, कार धडकल्या; ७ ठार, मृतांमध्ये मालाडच्या तिघांचा समावेश

नियम तोडला, कार धडकल्या; ७ ठार, मृतांमध्ये मालाडच्या तिघांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, जालना : समृद्धी महामार्गावर विरुद्ध  दिशेने गेलेल्या एका कारची समोरून येणाऱ्या कारशी जोराची धडक हाेऊन अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर कडवंची (ता. जालना) शिवारात हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कटरच्या सहाय्याने कारचे दरवाजे कापून मृत आणि जखमींना बाहेर काढावे लागले.     

पेट्रोल भरल्यानंतर कार नेली राॅंग साइडने मालाड पूर्व, मुंबई येथील कुटुंबीय कारने नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होते. दुसरी कार संदीप बुधवत चालवत होता. त्यामध्ये चौघे होते. त्यांनी कडवंची पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर कार मुंबई कॉरिडाॅरने नागपूरकडे विरुद्ध दिशेने नेली. त्याचवेळी कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, गंभीर जखमी अनिकेत चव्हाण याचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. 

Web Title: jalana accident Rules are broken, cars collide 7 killed, including three from Malad