मानधन वेळेत देण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:50 IST2018-04-08T00:50:49+5:302018-04-08T00:50:49+5:30
माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांचे प्रतिमाह मानधन वेळेत देण्यात यावे, असे निर्देश राज्यस्तरीय पथकाने शनिवारी संबंधित विभागाला दिल्या. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.

मानधन वेळेत देण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांचे प्रतिमाह मानधन वेळेत देण्यात यावे, असे निर्देश राज्यस्तरीय पथकाने शनिवारी संबंधित विभागाला दिल्या. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.
जिल्ह्यातील पोषण आहाराची तपासणीसाठी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी, अंकुश शहागंटवार, अजय बहिरे यांच्या पथकाने शनिवारी पीरपिंपळगाव, मानदेऊळगाव, राजूर, शहागड, अंबड पंचायत समिती आदी शाळांना भेट दिली. तपासणीत पथकाने समाधान व्यक्त केले. लोकमतने प्रकाशित केलेल्या ‘रिकाम्या खिशाने पोषण आहार’ वृत्ताची दखल घेत कामगारांचे मानधन वेळेत देण्याच्या सूचना पथकाने दिल्या. या वेळी पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी मकरंद सेवलीकर, उपशिक्षणाधिकारी रवी जोशी, डॉ. सुशील सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.