शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्ताकाम रांजणीकरांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

रांजणी ते विरेगाव मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकरी, नागरिकांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. या मार्गावरून जवळपास ४० गावांतील नागरिकांना ...

रांजणी ते विरेगाव मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकरी, नागरिकांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. या मार्गावरून जवळपास ४० गावांतील नागरिकांना प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे अनेकांनी या मार्गावरून प्रवास करणेच बंद केले आहे. शिवाय, रस्ता अपघातातही वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू केले आहे. परंतु, होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब लक्षात येताच सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच रहीम शेख यांनी शनिवारी दुपारी हे काम बंद पाडले.

रस्ताकाम बंद पाडल्याचे समजताच अभियंता ठोंबरे यांनी कामाला भेट देवून हे काम चांगल्या दर्जाचे करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच देशमुख, उपसरपंच शेख, जगन्नाथ काकडे, गजानन सोसे, मोईन बेग, सिकंदर शेख आदींची उपस्थिती होती.

सूचनांकडे दुर्लक्ष

रांजणी- विरेगाव या रस्त्याच्या कामाबाबत माजी पंचायत समिती सभापती नाना उगले, भगवान तांगडे व इतरांनीही नाराजी व्यक्त करीत चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, संबंधित गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केले. रस्ता खराब होत असल्याने शनिवारी काम बंद पाडण्यात आले. ग्रामस्थ आक्रमक होताच संबंधितांनी या रस्त्याचे काम चांगल्या पध्दतीने करण्यास सुरुवात केले आहे.

फोटो