शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दानवे, काळेंमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा; बैठकांवर भर, लग्नसोहळ्यांतही हजेरी

By विजय मुंडे  | Updated: April 29, 2024 14:37 IST

२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता.

जालना : २००९च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ८४८२ मतांनी पराभूत झालेल्या डॉ. कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीतही रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. जालना लोकसभा मतदारसंघात ‘महायुती’चे रावसाहेब दानवे आणि ‘मविआ’चे कल्याण काळे यांच्यात अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याची जणू स्पर्धा लागली आहे. या दोन्ही उमेदवारांनी दैनंदिन सकाळी ८ ते रात्री उशिरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विविध मित्रपक्षांसह संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशीही संवाद साधला जात आहे.

२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला तरी ‘मविआ’कडून कोणत्या पक्षाला जागा सुटणार आणि उमेदवार कोण राहणार? याची उत्सुकता कायम होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला जागा सुटली होती. परंतु, उमेदवार कोण राहणार? याचा प्रश्न कायम होता. उमेदवार जालना जिल्ह्यातील की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील? उमेदवार मराठा की ओबीसी? यावरही बरीच खल झाली. अखेर डॉ. काळे यांनाच पक्षाने संधी दिली. उमेदवारी जाहीर होताच दानवे आणि काळे यांनी मतदारसंघात बैठका, सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा सुरू असली तरी मतदार यंदा कोणाला संधी देणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

वंचित, बसपाही वाढविणार ‘बिपी’यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले, बसपाकडून निवृत्ती बनसाेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय इतर पक्षाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी जोर लावला आहे. वंचित, बसपासह अपक्ष उमेदवारांमुळे मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा ‘बिपी’ वाढण्याची चिन्हे आहेत.

उमेदवारांचा असा होता रविवाररावसाहेब दानवे‘महायुती’चे उमेदवार दानवे यांनी रविवारी सकाळी पीरपिंपळगाव, घाणेवाडी गावांतील मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या वतीने जालन्यात आयोजित मुंजीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यानंतर शेषमहाराज गोंदीकर, भगवानबाबा आनंदगडकर यांचीही भेट घेतली. सायंकाळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, सिंधी समाजासमवेत बैठक घेतली. मनोज महाराज गौड यांची मंदिरात भेट घेऊन रात्री वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

कल्याण काळे‘मविआ’चे उमेदवार कल्याण काळे यांनी रविवारी सकाळीच जालना शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठिकठिकाणी लग्नसोहळ्यांना हजेरी लावली. या सोहळ्यात शुभेच्छा देतानाच निवडणुकीचा प्रचारही काळेंसह समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४