जालना जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:11 IST2018-10-12T00:10:40+5:302018-10-12T00:11:28+5:30
सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात आले.
सध्या नवरात्रोत्सवामुळे दर्शनासाठी आणि दांडीयासाठी स्त्रीयांची गर्दी होत आहे. भारनियमनामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, छेडछाड, चोऱ्या अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच शेतकºयांनाही पिकांना पाणी देण्याची वेळ असून, त्यांचेही नुकसान होत आहे. महावितरणकडून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, आत्मानंद भक्त, नगरसेवक विजय पवार, किशोर नरवडे, दुर्गेश काठोठीवाले, घनशाम खाकीवाले, संतोष सलामपुरे, मुन्ना ठाकूर, अॅड. अशपाक पठाण, राजू सलामपुरे, बबन मगरे,सुरेश घोडे, दीपक राठोड, परमेश्वर शिंदे आदींची नावे आहेत.
शिवसेनेने आज जरी लोकशाही पद्धतीने निवेदन दिले आहे. मात्र वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर वीज वितरण कंपनीला देऊ असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी निवेदन देते वेळी दिल्याचे सांगितले.