भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:26 IST2021-01-07T18:25:05+5:302021-01-07T18:26:09+5:30

Accident in Jalana भोकरदन- जाफाराबाद रोडवर विरेगाव जवळ झाला अपघात

Husband and wife killed in Bhardhav bus collision | भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू

भोकरदन : भोकरदन येथे एका विवाह समारंभासाठी येत असताना विरेगाव जवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती व पत्नी ठार झाले आहे.

या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील वालसावंगी येथील  विष्णू त्र्यंबक गारोडी ( 55 ) हे दुचाकीवरून (एम एच 21 बिके 3596 ) पत्नीसह मंगलबाई विष्णू गारोडी ( 50 ) भोकरदन येथे एका लग्नासाठी येत होते. भोकरदन- जाफाराबाद रोडवर विरेगाव जवळ त्यांच्या दुचाकीला एसटीबसने जोरदार धडक दिली. यात पतीपत्नी गंभीर जखमी झाले. विष्णू गाढे, पोलीस कर्मचारी केंद्रे यांनी जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथे रवाना करण्यात आले. मात्र, त्यांचा जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
 

Web Title: Husband and wife killed in Bhardhav bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.