बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:07 IST2022-04-01T16:06:04+5:302022-04-01T16:07:22+5:30

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात आढळला मृतदेह

He was beaten and stripped naked, then his death body was dumped in a drain | बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

आंबा : बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना परतूर तालुक्यातील परतूर ते वाटूर रोडवरील मांडवा देवीजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परतूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नागरिकांना एका ४० ते ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह ४० ते ४२ वयोगटातील इसमाचा असून, त्याच्या अंगावर बेदम मारहाणीच्या खुणा आहेत. शिवाय, अंगावर कोणतेही कपडे नाहीत.
मारेकऱ्यांनी या इसमाचा खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे गायब केले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी परतूर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मयताची ओळख पटली नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: He was beaten and stripped naked, then his death body was dumped in a drain